भांडण, वादविवाद, मैत्री, अफेअर या सगळ्या गोष्टींमुळे ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी फुलताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी २’च्या घरातील लव्हबर्ड्स म्हणजे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले. रूपाली आणि पराग यांचं घरातील वावरणं पाहून सदस्यांनाही यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली आहे. सिझनच्या दुसऱ्या दिवसापासूनच या दोघांची चांगली मैत्री झाली. परागनं गार्डनमध्ये बसून गप्पा मारताना त्याच्या भूतकाळाविषयी, जोडीदारासोबत घटस्फोटाविषयी सांगितलं. त्यानंतर रुपाली नेलपॉलिश लावत गप्पा मारत असताना परागनं ती बाटली हातात घेत तिच्या पायांना नेलपॉलिश लावून दिलं.

वाचा : नाटकाचं तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?- सुमीत राघवन

घरात रंगणाऱ्या टास्कमध्येही पराग आणि रुपालीची मैत्री दिसून येते. नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी परागला रुपाली म्हणाली, ‘तू माझ्यावर प्रेम करू शकतोस किंवा माझा तिरस्कार करू शकतोस. पण मला टाळू शकत नाहीस.’ यावर परागने उत्तर दिलं, ‘मी तुझा तिरस्कार कधीच करू शकत नाही. पण तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच करू शकतो.’

इतकंच नव्हे तर रुपालीला नॉमिनेशन टास्कपासून वाचवण्यासाठी तो वैशाली म्हाडेला विनंती करताना दिसतो. नॉमिनेशन टास्कमध्ये जर त्याने नेहाला वाचवलं तर वैशालीनं रुपालीला वाचवायचं अशी डीलसुद्धा त्याने केली. यावेळी तो ‘तेरी दोस्ती, मेरा प्यार’ असं म्हणाला. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये काय होणार आणि सर्वांत पहिला कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is rumored love bird from bigg boss marathi season