अभिनेत्री रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन म्हणजे सिनेरसिकांच्या चर्चेचा आवडता विषय. हिंदी चित्रपटसृष्टीत रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांचीही नावं एकत्र घेतली जातात. रुपेरी पडद्यावर या दोघांचीही जोडी खास गाजली. पण, त्यासोबतच त्यांच्या पडद्यामागच्या केमिस्ट्रीविषयीही बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या. आज इतकी वर्षे उलटल्यानंतरही रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी सिनेरसिकांमध्ये वेगळ्याच प्रकारचे कुतूहल पाहायला मिळते. आपल्या अफेअरच्या चर्चा या दोन्ही कलाकारांनी उघडपणे स्वीकारल्या नाहीत. पण, विविध मुलाखतींतून मात्र काही वेगळेच चित्रं समोर आले होते.

‘सिलसिला’ या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा पुन्हा कधीच रुपेरी पडद्यावर एकत्र आले नाहीत. किंबहुना त्यांच्यातील नात्यामुळे या दोघांनी नेहमीच एकमेकांपासून दूर राहण्याला प्राधान्य दिले. परिणामी त्यांच्या कुटुंबामध्येही दुरावा पाहायला मिळाला. रेखा आणि अमिताभ बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गेले खरे. तिथेही सहसा त्यांनी एकमेकांना टाळलं. पण, बिग बींच्या नातीने म्हणजेच आराध्याने रेखा यांची भेट घेत सर्वांनाच थक्क केले.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘फिल्मफेअर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हा किस्सा गणेशोत्सवाच्या दिवसांमधील आहे. मुकेश अंबानी यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याही त्या कार्यक्रमाला गेले होते. बी- टाऊनच्या बऱ्याच सेलिब्रिटींची या क्रार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री रेखा. अंबानींच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी जेव्हा रेखा आल्या तेव्हा, अभिषेक आणि ऐश्वर्याने त्यांची भेट घेतली, त्यांचे स्वागत केले. त्याचवेळी बिग बींच्या नातीने म्हणजेच आराध्यानेसुद्धा रेखा यांचे आशीर्वाद घेतले. आराध्या नेहमीच आपल्याहून मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेते. पण, रेखा यांच्यासोबतचा तो क्षण फारच महत्त्वाचा होता असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आराध्या आणि रेखा यांची ही भेट, खऱ्या अर्थाने खास होती हे नक्की.

Story img Loader