सध्या इंटरनेटवर अनेक कलाकार, नेते, पत्रकार याचे दहा वीस वर्षांपूर्वीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपाचे तरूण कार्यकर्ते असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पत्रकार बरखा दत्त देखील होती. ‘ब्लास्ट फ्रॉम पास्ट’ हि संकल्पना नेटीझन्सने अधिक गांभिर्याने घेतली आहे. आता याच संकल्पनेवर आधिरित बॉलिवूडचा बादशहा शाहारूख खान याचा ९० च्या दशकातील एक लघुपट युट्युबवर व्हायरल झाला आहे.
१९९१ मध्ये शाहारुख खानचा ‘महान कर्ज’ नावाचा लघुपट आला होता. यात शाहारूख खान एका खजिनदारा मूलाच्या भूमिकेत होता. राजदरबारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणा-या युवकाची भूमिका त्याने  साकारली होती. SRKinMyBlood या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. शाहारूख खानने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. दूरदर्शन वाहिनीवर तो सुत्रसंचालन करायचा. त्यानंतर ‘फौजी’,  ‘सर्कस’ यांसारख्या मालिकांमधूनही शहारूख खानने काम केले होते. अनेक यशस्वी चित्रपटात शाहरुख खानने काम केले. त्यामुळे त्याचा हा प्रवास त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे. पण त्याने याचबरोबर लघुपटात देखील काम केले होते, हे मात्र फार कमीच लोकांना माहिती आहे. याआधी शाहारुख खानचा आणखी एक लघुपट युट्युबवर अपलोड करण्यात आला होता. पण त्याला फारसे व्ह्युज मिळाले नाही पण शाहारूखचा ‘महान कर्ज’ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.