‘कोई मिल गया’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच अठरा वर्षे झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि रेखा हे मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीला पडला होता. या चित्रपटातील जादू या एलियनने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण जादू ही भूमिका कुणी साकारली होती तुम्हाला माहितीये का?

जादू ही भूमिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेते इंद्रवदन पुरोहित यांनी साकारली होती. त्यांनी मालिकेत दयाबेनच्या लांबच्या नातेवाईकाची भूमिका साकारली होती. तसेच इंद्रवदन यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी जवळपास सहा भाषांमध्ये काम केले आहे. इंद्रवदन यांचा १८ सप्टेंबर २०१४मध्ये मृत्यू झाला.

आणखी वाचा : चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅनचा मृत्यू, दिग्दर्शक-निर्मात्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by memes (@shitbhai)

‘कोई मिल गया’ चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण होताच हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने जादूसोबत त्याचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत, ”हे त्याच्यासाठी ज्याने रोहितचं आणि वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यात आनंद आणला. माझ्या आयुष्यात जादू निर्माण केली. जादूने रोहितचा हात पकडला, त्याच्या जखमा भरल्या, चमत्कारांमध्ये विश्वास निर्माण केला. जादू जेव्हा रोहितच्या आयुष्यात आला तेव्हा तो फक्त तीन वर्षांचा होता. १८ वर्ष झाली आता तो २१ वर्षांचा झालाय. कधी कधी मी विचार करतो की आज तो कसा दिसत असले. तुम्ही काय विचार करत” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘कोई मिल गया’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केली आहे. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. आजही हा चित्रपट अनेकजण तितक्याच आनंदाने पाहातात.