Lata Mangeshkar: “नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, अगर याद रहे….” हा आवाज कायम स्मरणात राहील. ज्या आवाजाने आपल्या गाण्यांनी जगाला रडवले, प्रेम करायला शिकवले आणि मानवी भावनांच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला त्या भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने जगाला धक्का बसला आहे. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि आज सकाळी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आम्ही तुम्हाला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याशी संबंधित एक अनोखी गोष्ट आहे जी अनेकांना माहित नाही. लता मंगेशकर यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले होते. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. इतिहासात सर्वाधिक रेकॉर्ड केलेल्या गाण्यांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

(हे ही वाचा: Lata Mangeshkar: गानकोकिळा ते भारतरत्न; अमृत स्वरांनी अजरामर झालेला लतादीदींचा सुरेल प्रवास)

बिबिस आणि द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, १९७४ मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या एडिशनमध्ये लता मंगेशकर यांना सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून घोषित केले. त्यानंतर २५ हजार गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. पण या दाव्याला त्याचवेळी महान गायक मोहम्मद रफी यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लता मंगेशकर यांच्या नावाचा समावेश केला आणि यासोबतच मोहम्मद रफी यांचा दावाही छापण्यात आला होता. १९९१ मध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांची नावे वगळण्यात आली होती.

(LIVE UPDATE: Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन)

लहान बहिणीनेच मोडला रेकॉर्ड

लता मंगेशकर यांचा हा विश्वविक्रम त्यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मोडला. २०११ मध्ये, सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आणि त्यांनी पेक्षा जास्त भाषांमध्ये ११,००० सोलो, युगल आणि कोरस गाणी गायली असल्याचे अधिकृतपणे नोंदवले गेले आहे. मात्र, आता हे शीर्षक दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील गायिका पुलपाका सुशीला यांच्या नावावर नोंदवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This unique guinness book of world records was on lata mangeshkar name ttg