मराठी कलाकारांनी मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहेच, त्यासोबतच गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या कारकीर्दीचा ठसा बॉलिवूडमध्येही उमटवला आहे. अनेक नामवंत मराठी कलाकार आपल्याला हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात. या कलाकारांची यादी आता हळूहळू मोठी होताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

अशीच एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. याच चित्रपटात सर्वांची लाडकी अभिनेत्री क्षिती जोग महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात क्षिती जोग दिसणार असल्याची बातमी कळताच तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचा एक व्हिडिओ रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर क्षितीला मिठी मारताना दिसत आहे. क्षितीनेदेखील शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांबरोबरच आता क्षिती बॉलिवूडच्या प्रेक्षकांनाही पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची भुरळ घालणार यात अजिबात शंका नाही.

आणखी वाचा : video: ‘झिम्मा’ चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याव्यतीरिक्त धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. १० फेब्रुवारी २०२३ रोजी हा चित्रपट आपल्या भेटीला येईल.