अभिनेता रझा मुराद यांची भाची आणि अभिनेत्री बख्तावर खान अर्थात सोनम ही अजूनही ‘त्रिदेव’ चित्रपटामधील ‘तिरछी टोपी वाले..’ या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऋषी कपूर, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि अन्य काही बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेल्या या अभिनेत्रीने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनमने ‘त्रिदेव’ चित्रपटाचा दिग्दर्शक राजीव राय याच्यासोबत लग्न केले होते. तिने १९९२ मध्ये एका मुलाला जन्मही दिला. मुंबईत येण्यापूर्वी हे जोडपे लॉस एन्जेलिस आणि स्वित्झर्लंड येथे वास्तव्यास होते. पण, २००१ पासून हे दोघेही वेगवेगळे राहू लागले. मुल १८ वर्षांचं होईपर्यंत या जोडप्याने घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याच्या संमतीनेच सोनम आणि राजीवने घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर सोनमने डॉ. मुरली पोडुवल याच्यासोबत दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. या दोघांची पाँडेचरी येथे भेट झाली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनमचा मुलगा गौरव याच्या उपस्थितीत त्यांनी उटी येथे निकाह केला.

निकाहदरम्यान काढलेला सोनम आणि मुरलीचा फोटो

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर यश चोप्रा यांनी बख्तावरला ‘सोनम’ हे नाव दिले होते. तेव्हापासून बख्तावर ही सोनम या नावानेच नावारुपास आली. यश चोप्रा यांच्या ‘विजय’ (१९८८) या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती केवळ १४ वर्षांची होती. मात्र, ‘त्रिदेव’ (१९८९) या चित्रपटाने तिला खरी प्रसिद्धी मिळाली. १९८८ ते १९९४ या छोट्याशा कारकिर्दीत तिने ३० चित्रपटांमध्ये काम केले. राजीव राय याच्यासोबत लग्न केल्यानंतर वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिने चित्रपटसृष्टातून काढता पाय घेतला होता.