बॉयकॉट ट्रेंड आणि प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या असल्या तरी ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात ३०० कोटी इतकी कमाई केली असल्याचं म्हंटलं जात आहे. चित्रपटाला काही लोकांनी नावं ठेवली आहे तरी काही लोकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. रणबीर-आलिया यांची केमिस्ट्रीदेखील लोकांना प्रचंड आवडली आहे. तरी सोशल मीडियावर आलियाला सध्या बरंच ट्रोल केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गरोदारपणातही चित्रपटाच्या प्रमोशनला जाणं किंवा हाय हिल्स चपला घालणं यावरून आलियाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. नुकतंच रणबीर कपूरने याबद्दल एक वक्तव्य दिलं आहे. जी लोकं आलियाच्या गरोदर असताना काम करण्यावर कॉमेंट करत आहेत त्या लोकांच्या वृत्तीला रणबीरने इर्षा किंवा मत्सर असे नाव दिले आहे. आलियाने गरोदर असतानाच तिचा हॉलिवूडच्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, करण जोहरच्या एका चित्रपटाचं काम पूर्ण केलं शिवाय ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये ती सक्रिय होती. यावरून जी लोकं आलियाला ट्रोल करत आहेत त्याला तिच्याबद्दल मत्सर आहे. असं रणबीरने स्पष्ट केलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला, “गरोदर असतानाही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया पूर्णपणे सहभागी होती. तिच्याकडून तिने कसलीच कमतरता भासू दिली नाही. तिच्या या वागण्यामुळे कुणालाही प्रेरणा मिळेल. याबद्दल जर कुणी तिच्यावर टीका करत असेल तर ती लोकं नक्कीच आलियावर खार खात आहेत. आपण या सगळ्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करायला पाहिजे.”

आणखी वाचा : कंगनाच्या पाठोपाठ आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार इंदिरा गांधी यांची भूमिका

या मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला, “आलिया ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वाची अभिनेत्री आहे. ती केवळ माझी पत्नी आहे म्हणून मी हे बोलत नाही. तिचं चित्रपटक्षेत्रातील योगदान, तिचा स्क्रीनवरील वावर, तिचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. मी आजवर हे गुण कोणत्याही कलाकारात पाहिलेले नाहीत. याचा आपण सगळ्यांनीच आदर करायला हवा.” रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र चांगलाच सुपरहीट झाला असून प्रेक्षक ही जोडी पुन्हा पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.