‘अस्तित्व’ व ‘मुंबई थिएटर गाइड’चा अभिनव उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाविद्यालयीन विद्यार्थी, हौशी व प्रायोगिक नाटय़संस्था यांच्यासाठी ‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाइड’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘पॉकेट थिएटर’ (छोटी नाटय़गृहे) उभारली जाणार आहेत.

नाटय़कलेशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या ‘अस्तित्व’ या संस्थेचा येत्या २७ डिसेंबर रोजी २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ‘अस्तित्व’ संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती ‘अस्तित्व’चे रवी मिश्रा यांनी ‘रविवार वृत्तान्त’ला दिली.

‘पॉकेट थिएटर’ हा याच उपक्रमाचा एक भाग आहे. मुंबईत मालाड येथे ‘क्लॅप’ आणि गोरेगाव येथे ‘पीटारा’ या नावाने आम्ही अशी छोटी नाटय़गृहे उभारली आहेत. या दोन्ही नाटय़गृहांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाटक करणारे समूह, हौशी व प्रायोगिक नाटय़संस्था यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे शंभर ते सव्वाशे आसनक्षमता असलेला छोटय़ा नाटय़गृहांचा प्रयोग यशस्वी ठरला असल्याचे सांगून मिश्रा म्हणाले, मुंबईत अंधेरी येथे लोखंडवाला संकुल, वांद्रे व लोअर परळ येथे अशा प्रकारची आणखी तीन नाटय़गृहे उभारणार आहोत. ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमासाठी खुली एकांकिका स्पर्धा व पथनाटय़े हा ‘अस्तित्व’चा पहिला मोठा उपक्रम होता. ‘नाटय़दर्पण रजनी’तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या गाजलेल्या स्पर्धेचे आम्ही पुनरुज्जीवन केले. पहिल्याच वर्षी ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी सुचविलेल्या ‘कठीण  होत आहे रे’ या काव्यपंक्तींवर आधारित नाटके सादर झाली. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (आम्ही कोण म्हणूनी काय पुसता), ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (आज अचानक गाठ पडे) तसेच ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड, नाटककार सतीश आळेकर आदींनीही सुचविलेल्या कल्पनेवर आधारित नाटके यशस्वीपणे सादर झाली आहेत. याचबरोबर ‘अस्तित्व’ आणि ‘आयएनटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी भाषेसाठी खुली नाटय़स्पर्धा, ‘लोकसत्ता-हास्यरंग’ व अस्तित्वतर्फे विनोदी एकांकिका आदी उपक्रमही राबवले असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने ‘पारंगत सन्मान’, चांगले लेखक घडविण्यासाठी नाटय़लेखन शिबीर आम्ही आयोजित केले होते. अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाइड यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘ई नाटय़शोध’ ही ऑनलाइन एकांकिका स्पर्धा हाही आमचा एक वेगळा प्रयोग आहे. त्याच बरोबरीने ‘ई नाटय़ संहिता लेखन स्पर्धा’, चर्चा, परिसंवाद, मुलाखती यांचा समावेश असलेला ‘ई नाटय़ चौपाल’, कविता वाचन, अभिवाचन, नाटय़संहिता वाचन आदींसाठीचा ‘ई परफॉमर्स’, ‘ई वस्तुस्थिती’ हेही आमचे वेगळे प्रयोग आहेत. ‘ई नाटय़संहिता’ स्पर्धेअंतर्गत आज आमच्याकडे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी भाषेतील शंभरहून अधिक संहिता तयार आहेत. याची ‘ई बुक’ही आम्ही तयार केली आहेत. गेली तीन वर्षे ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या आयोजनात संपूर्ण राज्यभरात ‘अस्तित्व’ मदत करत आहे. आमच्यासाठी ही आनंदाची आणि गौरवाची बाब असल्याचे मिश्रा म्हणाले.

संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत प्रकाश बुद्धीसागर, प्रदीप राणे, भालचंद्र झा, डॉ. अनिल बांदिवडेकर, डॉ. सरस्वती स्वामीनाथन, कीर्तीकुमार नाईक, प्रमोद लिमये, मुकेश जाधव, संदीप मिश्रा, क्षीपाद भारती, माझी पत्नी रिती, डॉ. जब्बार पटेल, सुनील कदम, माझे गुरू व मार्गदर्शक ‘भारतीय विद्या भवन’चे गिरीश या सगळ्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही मिश्रा यांनी आवर्जून सांगितले.