मराठमोळ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचे लाखो चाहते आहेत. अभिनयाबरोबरच पद्मिनी त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहेत. पद्मिनी यांनी ‘प्रेम रोग’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण कोणत्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये त्यांच नाव आलं नव्हतं. मात्र, ८० च्या दशकात एक अशी घटना घडली ज्यामुळे पद्मिनी यांचं नाव जगभरात चर्चेत होतं.
१९८० मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी चित्रपटाचं चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर प्रिन्स चार्ल्स यांनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांचे स्वागत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी केले होते. तेव्हा त्यांनी स्वागत करताना प्रिन्स चार्ल्स यांना गालावर चुंबन केले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिंसेस डायाना यांच लग्न देखील झालं नव्हतं. त्यामुळे पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विषयी जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
अलीकडेच या घटनेची आठवण पद्मिनी कोल्हापुरे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. “प्रिन्स चार्ल्स मुंबईला येणार होते आणि त्यांना शुटिंग पाहायचं होतं. मला कळलं नाही की त्यांनी असं का म्हटलं होतं. ते आले तेव्हा आम्ही राजकमल स्टुडिओमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होतो. शशिकला जी यांनी त्यांची आरती केली होती. मी त्यांच स्वागत केलं आणि गालावर चुंबन केलं होतं. खरं तर त्या काळी ती खूप मोठी गोष्ट होती,” असं त्या म्हणाल्या.
या मुलाखतीत त्यांनी या संबंधीत एक किस्सा सांगितला. जेव्हा त्या लंडनला गेल्या होत्या, तेव्हा एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांना ओळखलं आणि तो म्हणाला ‘प्रिन्स चार्ल्स यांना चुंबन करणारी मुलगी तुच आहेस का? आणि हा प्रश्न ऐकल्यानंतर मला लाज वाटली होती,’ असं त्यांनी सांगितलं.