सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, अजय देवगण या मंडळींनी चित्रपटनिर्मितीची समीकरणेच आजघडीला बदलून टाकली आहेत. त्यांची लोकप्रियता मोठी त्यामुळे त्यांच्या जोरावर चित्रपट वितरण-विपणन खांद्यावर घेणाऱ्यांचं गणितही बळकट होत चाललं आहे. शंभर, दोनशे, पाचशे कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय करणाऱ्या या कलाकारांचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात तेव्हा ही तोटय़ाची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न उरतोच. मात्र या मंडळींनी ती जबाबदारी स्वीकारत वितरकांना तोटा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत चित्रपट व्यवसायात एक नवीन पायंडा घालून दिला आहे. यशराज फिल्म्सने आमिर खान आणि अमिताभ बच्चन या मोठ्या कलाकारांसोबत ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’सारखा भव्य- दिव्य चित्रपट केला आणि तो तितक्याच भव्य-दिव्यतेने आपटला. त्यामुळे आता थिएटर मालक आमिरकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचं समजतंय.
‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मुळे थिएटर मालक निराश; निर्मात्यांकडे करणार नुकसान भरपाईची मागणी
शंभर, दोनशे, पाचशे कोटींपेक्षाही जास्त व्यवसाय करणाऱ्या या कलाकारांचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात तेव्हा ही तोटय़ाची जबाबदारी कोणी घ्यायची, हा प्रश्न उरतोच.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-11-2018 at 18:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thugs of hindostan exhibitors to demand refund for their losses aamir khan amitabh bachchan