पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आमिर खान, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असेलला ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ने दमदार ओपनिंग केली. पण चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. तरीही तीन दिवसांमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाची समीक्षकांसह प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ने पहिल्याच दिवशी तब्बल ५२.२५ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर तीन दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दुसऱ्या दिवशी २८.२५ कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी २२.७५ कोटींची कमाई केली आहे. तमिळ आणि तेलगु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ ३.२५ कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत हा आकडा १०५ कोटींवर पोहोचला आहे.

 

 आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ने त्याच्याच ‘दंगल’ आणि ‘धुम ३’ या चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘ठग्स..’चा समावेश झाला आहे.

Story img Loader