बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दिसणार आहे. यावेळी त्याने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा केला. दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे टायगर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. पण पहिल्यांदाच या शोमध्ये टायगर त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलला आहे. या शोमध्ये क्रिती सेननही त्याच्यासोबत स्पेशल गेस्ट म्हणून दिसली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “सारा अली खानला तुरुंगात टाका”; ‘या’ व्यक्तीची मागणी, नेमकं घडलं काय?

टायगर म्हणाला, “मला वाटतंय की मी सिंगल आहे आणि सध्या मी डेट करण्यासाठी कोणाला तरी शोधत आहे. मी नेहमीच श्रद्धा कपूरकडे आकर्षित होतो. ती ग्रेट आहे, असं मला वाटतं.” दरम्यान, टायगरचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. तो अभिनेत्री दिशा पटानीला ६ वर्षांपासून डेट करत होता, मात्र अलीकडेच दोघंही वेगळे झाल्याची चर्चा आहे. टायगर आणि दिशा यांनी कधीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती, परंतु दोघं अनेकदा एकत्र दिसायचे.

हेही वाचा – VIDEO: महेश बाबूची मुलगी सितारा ‘DID तेलुगू’च्या मंचावर थिरकली; अभिनेता कौतुकाने म्हणाला…

टायगरच्या एका मित्राने अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली आणि सांगितले की “आम्हाला काही आठवड्यांपूर्वीच याबद्दल माहिती मिळाली. याबाबत तो आजपर्यंत कोणाशीही बोलला नव्हता. सध्या टायगर त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. दिशाशी ब्रेकअपचा त्याच्यावर फारसा परिणाम झालेला नाही.” याबद्दल दैनिक भास्करने वृत्त दिलंय.

हेही वाचा – 67th Filmfare Award 2022: रणवीर सिंग आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री; तर ‘शेरशाह’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

टायगरने २०१४ मध्ये आलेल्या ‘हिरोपंती’ सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासह क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. टायगरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर तो ‘गणपत’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘रॅम्बो’ आणि ‘बागी-४’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तो शेवटचा ‘हिरोपंती २’ मध्ये दिसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff confirm break up with disha patani says shradhha kapoor atracts him hrc