बॉलीवूडमधले आघाडीचे तीन खान म्हणजे आमिर, सलमान आणि शाहरुख यांच्यासोबत काम करणे बहुतेक नवकलाकारांचे स्वप्न असते. मात्र, याला अपवाद असा नवकलाकार म्हणजे टायगर श्रॉफ.
‘हिरोपन्ती’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या टायगरने एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्याला कोणत्या खानसोबत काम करायला आवडेल अशा प्रश्न विचारला गेला. त्यावर मला एकाही खानासोबत काम करण्यची इच्छा नाही, असे त्याने म्हटले. त्याच्या या उत्तराने सगळयांनाच तेथे धक्का बसला. पण पुढे टायगर म्हणाला की, जर मी त्यांच्यासोबत काम केले तर मला कोण चित्रपटात पाहणार?. टायगरचे हे उत्तर नक्कीच योग्य होते.

Story img Loader