बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनी मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतीच दिशा पाटनीनं बॉयफ्रेंड टायगर श्रॉफचा चित्रपट ‘हिरोपंती २’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हिरोपंती २’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी दिशानं लव्हेंडर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. मात्र या स्क्रिनिंगच्या वेळचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तिच्या लुकवरून काही युजरनी तिची खिल्ली उडवली आहे. दिशाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- राधिका आपटेचा व्हिडीओ चर्चेत, अभिनेत्रीला अशा अवस्थेत पाहून चाहते हैराण

पॅपराजीला पोझ देत असतानाची दिशाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिचा लुक खूप वेगळा आणि बदलेला दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना बऱ्याच युजरनी तिच्या लुकवर निशाणा साधला आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘आता ही देखील लिप सर्जरी करून आली आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली, ‘नोज जॉबनं हीचा चेहरा देखील वाणी कपूर प्रमाणेच खराब करून टाकला आहे.’ आणखी एका युजरनं, ‘हिने तर लिप्स सर्जरी करून आपलं नैसर्गिक सौंदर्य खराब करून टाकलं आहे.’

आणखी वाचा- “दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानं बॉलिवूड हादरलंय” मनोज बाजपेयीचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान दिशा पाटनीच्या नोज आणि लिप सर्जरीची चर्चा तर मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. मात्र दिशानं याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही किंवा लिप्स सर्जरी केल्याच्या वृत्ताची पुष्टी देखील केलेली नाही. मात्र तिचे सोशल मीडियावरील पूर्वीचे फोटो आणि आताच्या फोटो यात खूपच फरक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. याशिवाय टायगर आणि दिशाच्या नात्याबद्दल बोलायचं तर हे दोघं नेहमीच एकमेकांसोबत स्पॉट होतात. मात्र त्यांनी अद्याप आपल्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff heropanti 2 spcial screening girlfriend disha patani video goes viral mrj