अभिनेता टायगर श्रॉफचा ‘बागी’ हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या महिन्याअखेरिस प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबद्दल आपण खूप उत्सुक असून, टायगर श्रॉफ हाच बॉलिवूडमधील पुढील लक्ष वेधणारी व्यक्ती असेल, असे ट्विट अभिनेता ह्रतिक रोशन याने केले आहे.
ह्रतिक सध्या त्याच्या ‘मोहंजोदडो’ या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. त्याला ट्विटरवर एका व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने आपण ‘बागी’ बद्दल खूपच उत्सुक असून, टायगर श्रॉफ हाच बॉलिवूडमधील पुढील लक्ष वेधणारी व्यक्ती असेल, अशा आशयाचे वक्तव्य त्याने ट्विटमध्ये केले आहे. बागी चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. सध्या या चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला असून, अनेकांनी प्रोमोला प्रसंती दिली आहे. ‘बागी’ या अॅक्शनपटामध्ये टायगर श्रॉफ बरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूरही दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा