आलोक नाथ, यामी गौतम यांनंतर आता ट्विटरकरांनी बॉलीवूडमधील नवअभिनेता टायगर श्रॉफवर निशाणा साधला आहे. ट्विटर या सोशल साइटवर सध्या टायगर श्रॉफ ट्रेण्डमध्ये असून त्याच्यावरील विनोदांचा तेथे पाऊसचं पडत आहे. काहींना त्याच्या दिसण्यावर तर काहींनी त्याच्या नावावरून विनोद केले आहेत. टायगरवर करण्यात आलेले काही विनोदी ट्विट्सः



टायगर श्रॉफ हा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा आहे. आमिरला धूम ३ चित्रपटासाठी पिळदार शरिरयष्टी करण्याकरिता मदत केल्यामुळे तो गेल्यावर्षी चर्चेत आला होता. याच महिन्यात आमिरने टायगरच्या ‘हिरोपन्ती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरणही केले. नवअभिनेत्री किर्ती सनॉन आणि टायगरची प्रमुख भूमिका असलेला ‘हिरोपन्ती’ चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader