साबीर खान दिग्दर्शन असलेल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून अभिनेते जॉकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, किर्ती सनोन यांच्यासह तब्बल २१ नवीन चेहरे पहायला मिळणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी बॉलीवूडमधील ज्येष्ठ कलाकारांना घेता आले असते, परंतु त्यामुळे नायक-नायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या टायगर आणि किर्तीवर दडपण आले असते. या एकमेव कारणासाठी साबीर खानने या चित्रपटात २१ नव्या चेहऱ्यांना संधी दिली. या चित्रपटात नवखे कलाकार काम करणार असले तरी त्यामुळे  चित्रपटाच्या दर्जात कोणताही फरक पडला नसल्याचे साबीरने सांगितले. येत्या २९ एप्रिल रोजी ‘जागतिक नृत्य दिना’च्या निमित्ताने टायगर श्रॉफ प्रेक्षकांमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे.

Story img Loader