अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अॅक्शन आणि स्टंट्ससाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील अॅक्शनचे प्रेक्षक चाहते आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत फ्लाइंग जट टायगरने हॉलिवूडच्या स्पायडर-मॅनसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा केलाय. २००२मध्ये स्पाडयरमॅनची सीरिज सुरू झाल्यापासून आतापर्यंत हॉलिवूड अभिनेते टोबे मॅग्वायर, अँड्र्यू गारफिल्ड आणि टॉम हॉलंड यांनी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

स्वप्नाचा नक्षीदार प्रवास; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केली प्रदर्शनाची तारीख

दरम्यान, मार्व्हल कॉमिक्समध्ये स्पायडर-मॅनचे भारतीय व्हर्जन असतानाही अजून कोणत्याही भारतीय अभिनेत्याने त्याला पडद्यावर साकारलेलं नाही. अशातच आता टायगरने आपण स्पायडरमॅनसाठी ऑडिशन दिल्याचा खुलासा केलाय. ही भूमिका मिळण्याच्या अगदी जवळच्या स्टेजला पोहोचलो होतो, असंही त्याने सांगितलं. “मी त्यांना माझ्या टेप्स, शो-रील्सदेखील पाठवले होते. मी काय करू शकतो, हे पाहून ते खूप प्रभावित झाले होते. मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमचा VFX वरील खर्च वाचवू शकेन, कारण स्पायडर-मॅन जे काही मी करू शकतो ते मी करू शकतो,” असं कनेक्टएफएम कॅनडाला दिलेल्या मुलाखतीत टायगर म्हणाला.

रश्मिकाने विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या…”

टायगरने कोणत्या एडिशनसाठी ऑडिशन दिली, हे मात्र त्याने सांगितलं नाही. तसेच हॉलिवूडबद्दल तो म्हणाला, “मला तिथल्या अनेक प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळाली. मी जे काही करतोय, त्यात त्यांना रस असल्याचंही मला जाणवलं. जॅकी चॅननंतर कोणीही क्रॉसओवर अॅक्शन हिरो झालेला नाही आणि अॅक्शन हिरो प्रकारात माझ्या वयातला कोणताही अभिनेता आहे,” असं मला वाटत नाही.”

दरम्यान, टायगरचा शेवटचा हिरोपंती २ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला होता. ७० कोटीचं बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ ३५ कोटी रुपये कमावले होते.

Story img Loader