छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री अनेक ट्रोलर्सला उत्तर देताना दिसतात. काहि दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुषा दांडेकरने तिच्या अंतर्वस्त्रांवर प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याला उत्तर दिले होते. आता बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफची बहिण कृष्णाने देखील असेच काही केले आहे. कृष्णा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले. मात्र, कृष्णा या वेळेस थांबली नाही तर तिने त्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कृष्णाने बिकीनी परिधान केली आहे. ‘वाईल्ड चाईल्ड’ असे कॅप्शन कृष्णाने ते फोटो शेअर करत दिले आहे. या फोटोला अनेक चाहत्यांनी पसंती दिली आहे. तर अनेकांनी या फोटोवरून कृष्णाला ट्रोल केलं आहे. “बाई, तुमचा भाऊ टायगर किती चांगला आहे आणि तुम्ही तितकेच निर्लज्य आहात. तुम्हाला लाज वाटली नाही? तुमचे आई-वडील अशी पोस्ट पाहत नाहीत?” कृष्णा अशी कमेंट वाचून थांबली नाही तिने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले. “सर, तुम्ही माझी चिंता केली यासाठी तुमचे आभार, पण तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही तुम्ही शांत बसू शकता. धन्यवाद. कोणीतरी माझ्या या मेसेजचे भाषांतर करू शकता का”, असे कृष्णा म्हणाली.

 

दरम्यान, या आधी कृष्णाने वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडीओत जॅकी आणि कृष्णा स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसत आहे. कृष्णा ही भाऊ टायगरसारखीच फिटनेस फ्रिक आहे. या आधी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिने टायगरला खांद्यावर घेतले होते. दुसरी कडे जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff s sister krishna shroff slammed a user for trolling over a bikin pic dcp