आपल्याच मुलासोबत स्पर्धा करणं हे कुठच्याच पित्याला नाही आवडणारं. पण, जॅकी श्रॉफ आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेला त्याचा मुलगा टायगर श्रॉफ यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. जॅकी श्रॉफचा ‘कोचादैय्यान’ आणि टायगरचा ‘हिरोपन्ती’ हा चित्रपट २३ मे ला एकाच दिवशी प्रदर्शित होत आहे.
शरीरसौष्ठव, स्टंट आणि ट्विटवरील जोक्समुळे आधीच प्रसिद्धीस आलेला २४ वर्षीय टायगर हा ‘हिरोपन्ती’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असून किर्ती सनॉनने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरने चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असल्यामुळे त्याला अजीबात भीती वाटत नाही आहे. तर दुसरीकडे त्याचे पिता आणि अभिनेता जॅकी श्रॉफ तमिळ सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कोचादैय्यान’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-05-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff to clash with dad jackie shroff at box office