‘हिरोपंती’ चित्रपटात काम केलेला अभिनेता टायगर श्रॉफ ‘बागी’ या चित्रपटात दिसणार असून, चित्रपटातील व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. साजिद नाडियादवालांची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील आपल्या लूकवर टायगर कमालीची मेहनत घेत आहे. ‘बागी’मध्ये एका विद्रोही व्यक्तिची भूमिका साकारत असलेला टायगर चित्रपटात अनेक रुपांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यातील एका लूकसाठी तो टक्कल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. टायगरच्या लूकबाबत चित्रपटकर्त्यांनी मौन बाळगले आहे. टायगरला टक्कल करावे लागणार असल्याचा निर्णय चित्रपटकर्त्यांकडून घेण्यात आला असून, टायगरनेदेखील यास संमती दिल्याची चर्चा आहे. ‘बागी’ चित्रपटातील आपल्या लूकबाबत गुप्तता बाळगण्यासाठी टायगरने ४५ हुडी विकत घेतल्याचे समजते.

Story img Loader