बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी पूजा एका टिक-टॉक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून पूजाने संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याची संमती कोण देतं? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

असं काय आहे या व्हिडीओमध्ये?

पूजाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ फैजल सिद्दीकी नावाच्या टिक-टॉकरचा आहे. या व्हिडीओमध्ये तो एका तरुणीच्या तोंडावर अॅसिड फेकण्याचा अभिनय करत आहे. या कृतीमुळे पूजा संतापली आहे.

“या लोकांची समस्या काय आहे? ही अत्यंत चुकीची कृती आहे. टिक-टॉक इंडिया तुम्ही अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याची संमती कशी काय देता? या व्यक्तिला कामावर पाठवण्याची गरज आहे. या व्हिडीओमधील तरुणीला कळतंय की तिने कुठल्या प्रवृत्तीला पाठिंबा दिला आहे.” अशा आशयाचे ट्विट पूजाने केले आहे.

पूजा भट्ट समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर नेहमीच प्रतिक्रिया देत असते. या पार्श्वभूमीवर तिने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पूजाच्या ट्विटला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आपला संताप देखील व्यक्त केला आहे.

Story img Loader