‘मॉनसू वेडिंग’ आणि ‘सर’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री तिलोत्तमा शोम ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिलोतमा ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिलोतमाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे सध्या तिलोत्तमा चर्चेचा विषय ठरली आहे.

तिलोतमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो चर्चेचा विषण ठरण्यामागे कारण म्हणजे तिलोत्तमाच्या काखेतले केस. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तिलोतमाने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या टी-शर्टवर क्षमाशील नाही असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करत तिलोतमाने तिच्या काखेतल्या केसांविषयी बोलताना म्हणाली, “शरीरावर असलेल्या केसांबद्दल मी माफी मागणार नाही. मला ते आवडतात म्हणून ते मी ठेवले आहे. मी वॅक्स करते आणि नाही सुद्धा.”

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

आणखी वाचा : नेटकऱ्यांंनी ट्रोल केल्यानंतर राजकुमार रावला पत्नीचा ‘तो’ फोटो करावा लागला डिलीट

तिलोतमा सगळ्यात शेवटी नेटफ्लिक्सवरील सर या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअ क्रिचिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तिलोतमाने २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या मॉन्सुन वेडिंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Story img Loader