रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ‘टाइमपास २’ (टीपी२) या चित्रपटाने चार दिवसांत ११ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे ‘टाइमपास २’ हा रितेशच्या ‘लय भारी’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढेल, अशी शक्यता वर्तविणे चुकीचे ठरणार नाही.
प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टाइमपास २’ हा चित्रपट १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी प्रदर्शित झाला. यादिवशी सुट्टी असल्यामुळे मराठी प्रेक्षकांनी सर्वच चित्रपटगृहांत गर्दी केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ३ कोटी ८० लाखांचा गल्ला जमवत विक्रमी कमाई केली. चित्रपटाच्या कमाईची गाडी त्यावरच न थांबता चार दिवसांत ‘टीपी२’ने तिकीट बारीवर ११ कोटींची कमाई केल्याची माहिती आहे. अर्थातच, सलग चार दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटाच्या कमाईवर झालेला आहे. त्यामुळे आता आठवड्याभरात ‘टीपी२’ तिकीट बारीवर किती कमाई करणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
दरम्यान, या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. टाइमपास इतका ‘टीपी२’ प्रभावी नसल्याचे प्रेक्षकांकडून म्हटले जात असले तरी प्रीक्वेलची पूर्वपुण्याई सीक्वेलला नक्कीच तारून नेऊ शकते हे ‘टाइमपास २’चा आतापर्यंतचा गल्ला पाहिल्यावर कळते.
‘टाइमपास २’ सुसाट; चार दिवसांत ११ कोटींचा गल्ला!
रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास' या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या 'टाइमपास २' (टीपी२) या चित्रपटाने चार दिवसांत ११ कोटींचा गल्ला जमावला आहे.
First published on: 04-05-2015 at 01:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timepass 2 earned 11 crore on box office in 4 days