‘टाइमपास’मधले दगडू आणि प्राजू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. पण, या भूमिकांमुळे लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणारे प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर हे यात दिसणार नाहीत. कारण आता दगडू आणि प्राजू आता मोठे झाले असून ‘टाइमपास’चा सिक्वल असलेल्या ‘टाइमपास २’मध्ये या भूमिका प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट हे साकारणार आहेत.
गेले काही दिवस ‘टाइमपास २’मध्ये दगडू आणि प्राजक्ताची भूमिका कोण साकारणार यावर चर्चा सुरु होती. त्याबद्दल अनेक तर्कही लावण्यात येत होते. पण, झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान रवी जाधवने याचा खुलासा केला. मनोरंजक पद्धतीने प्रियदर्शन आणि प्रिया यांना दगडू आणि प्राजू म्हणून पुरस्कार सोहळ्यात सादर करण्यात आले. दगडूच्या भूमिकेकरिता सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची नावे तर प्राजक्ताच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकर, अमृता खानविलकर आणि सोनाली कुलकर्णी यांची नावे पुढे आली होती. अखेर प्रियदर्शन आणि प्रिया बापट यांनी बाजी मारली. ‘टीपी२’ मध्ये वैभव मांगले आणि भाऊ कदम हे ‘टाइमपास’ चित्रपटामधील त्यांच्या पूर्वभूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘टाइमपास २’ हा चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा