रवि जाधवच्या टाइमपास तिकीट बारीवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटाच्या यशानंतर आता त्याच्या सर्व चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘टाइमपास २’ची. तर प्रेक्षकहो, ‘टाइमपास २’ हा पुढच्यावर्षी नववर्षाचे स्वागत करणार असून हा चित्रपट २ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. रवि जाधवने आपल्या फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.
मी सिंगापुर मध्ये असताना इथे भारतात मात्र उरण, कळवा व ठाणे ( हो, एकच वेळी ३ ठिकाणी ) ‘टाइमपास २’ चे शूटिंग सुरु असल्याची अफवा जोरात पसरत होती. या अफवेचा जोर इतका होता की तिथे सातासमुद्रापार सिंगापुरला मला अनेक जणांनी विचारले की ठाण्याला शूटिंग चालू आहे आणि तुम्ही इथे कसे? आता काय बोलणार? असे रविने फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. मात्र, त्याने आपल्या चाहत्यांना निराश न करता पुढे म्हटले की, ‘टाइमपास – २’ ची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व प्रेक्षकांना मी इतकेच सांगेन की ‘टाइमपास – २’ च्या कथा व संगीतावर काम चालू झाले असून, अजून ४-५ महिन्यात त्याचे शूटिंग सुरु होईल व जर सर्व सुरळीत पार पडले तर २ जानेवारी २०१५ ला ‘टाइमपास २’ प्रदर्शित होईल.

Story img Loader