मनोरंजनाची खमंग मेजवानी असलेला टाइमपास-३ हा चित्रपट नुकतंच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यानंतर आता ‘टाईमपास -३’ प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसत आहे. या चित्रपटात दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच आवडताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. नुकतंच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट टाइमपास ३ या चित्रपटातून उलगडताना पाहायला मिळत आहे.

‘टाइमपास-३’ पाहिल्यानंतर हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “आता तिच्यात…”

टाइमपास ३ हा चित्रपट शुक्रवारी २८ जुलै प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, डायलॉग हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. गेल्या दोन दिवसात २ कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी या चित्रपटाने १ कोटी १० लाखांचा गल्ला जमवला आहे, अशी माहिती समोर येत आहे. हा चित्रपटाचा एकूण बजेट तब्बल १० कोटी रुपये आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत वाढ होणं गरजेचे असल्याचे बोललं जात आहे.

उद्धव ठाकरे कमी पडले की देवेंद्र फडणवीस भारी पडले? सुप्रिया सुळे म्हणतात “दिल्लीवाल्यांची यंत्रणा…”

या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत प्रथमेश परब, हृता दुर्गुळे ही पालवी, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि पालवीच्या वडिलांच्या भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळत आहेत.

पाहा व्हिडीओ –

या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास ३ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. शुक्रवारी २९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timepass 3 box office collection hruta durgule prathamesh parab movie release update nrp