मनोरंजनाची खमंग मेजवानी असलेला ‘टाइमपास-३’ हा चित्रपट नुकतंच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यानंतर आता ‘टाइमपास -३’ प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसत आहेत. चाहत्यांचा आवडता दगडू तोच असला तरी या भागात प्रेक्षकांना यात एक नवी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाईमपास -३’या चित्रपटाचा प्रीमिअर शो शुक्रवारी मुंबई पार पडला. या चित्रपटाच्या प्रीमिअर शो ला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनी चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलं. विशेष म्हणजे या प्रीमिअर शोला हृताचा नवरा प्रतीक शाह आणि सासूबाई अभिनेत्री मुग्धा शाह यांनी देखील हजेरी लावली. यावेळी हा चित्रपट पाहून मुग्धा शाह यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

हृताची प्रमुख भूमिका अनन्या या चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लगेचच हृताचा टाइमपास ३ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या प्रीमिअरला हृता आणि मुग्धा या सासू-सुनेत असलेलं छान बाँडिंगही दिसत होतं. मुग्धा शाह यांनी यावेळी काळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. तर हृतानं चेक्सचा ट्राऊजर आणि कोट घातला आहे. त्यासोतब तिने केसही बांधले होते. या ड्रेसमध्ये हृताही खूपच स्टायलिश अंदाजात दिसत आहे. प्रतीकने या तिघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यावेळी हृताच्या भूमिकेचे कौतुक करताना तिच्या सासूबाई म्हणाल्या, “आम्ही दोघींनी दुर्वा नावाची एक मालिका केली होती. यात तिने माझ्या मुलीची भूमिका केली होती. ती तिची पहिलीच मालिका होती. पण आता तिच्यात अभिनयात फारच फरक झाला आहे. दोन वेगवेगळ्या भूमिका असलेले चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होणं ही एक मोठी गोष्ट आहे. त्यासोबतच त्यातून स्वत:ला सिद्ध करणं हे फार महत्त्वाचे आहे. तिने फारच उत्तम काम केले आहे. हृता, मला तुझा खूप अभिमान वाटतो.”

पाहा व्हिडीओ –

‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timepass 3 hruta durgule mother in law mugdha shah first reaction after watching movie nrp