देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे. पण त्यापूर्वी अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोषात झाला होता. त्यानंतर आता परदेशात अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी अंबानी व मर्चंट कुटुंबातील सदस्यांसह बॉलीवूड सेलिब्रिटी काल इटलीला रवाना झाले आहेत.
उद्या (२९ मे)पासून अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला सुरुवात होणार असून १ जूनपर्यंत असणार आहे. हा चार दिवसांचा सोहळा क्रूझवर असून इटली ते फ्रान्स असा प्रवास असणार आहे. क्रूझवर चार दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ८०० पाहुण्यांव्यतिरिक्त ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर उपस्थित असणार आहेत. पण तुम्हाला हे माहितीये आहे का? अंबानी कुटुंबातील काही सूना आपल्या पतीपेक्षा वयाने मोठ्या आहेत. अंबानी कुटुंबातील या सूना कोण आहेत? जाणून घ्या…
हेही वाचा – अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधला पहिला फोटो आला समोर, ओरीने दाखवली लक्झरी क्रूझची झलक
टीना अंबानी
अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेल्या टीना अंबानी मुकेश अंबानींचे छोटे भाऊ अनिल अंबानी यांच्या पत्नी आहेत. टीना अंबानींचा जन्म ११ फेब्रुवारी १९५७मध्ये झाला होता आणि अनिल अंबानींचा जन्म ४ जून १९५९ साली झाला होता. त्यामुळे टीना अनिल यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.
श्लोका मेहता
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी २०१९मध्ये श्लोका मेहताबरोबर लग्नबंधनात अडकला. श्लोका ही आकाशपेक्षा वयाने मोठी आहे. श्लोकाचा जन्म ११ जुलै १९९०साली झाला होता. तर आकाशाचा जन्म २३ ऑक्टोबर १९९१ साली झाला होता. याचाच अर्थ आकाश अंबानी श्लोकापेक्षा एका वर्षाने छोटा आहे.
राधिका मर्चंट
अंबानी कुटुंबात पतीपेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या सूनांच्या यादीत राधिका मर्चंटचं नाव सामील होणार आहे. अंबानींची होणारी सून राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४मध्ये झाला होता आणि अनंतचा जन्म १० एप्रिल १९९५मध्ये झाला होता. याचाच अर्थ राधिका अनंतपेक्षा तीन महिन्यांनी मोठी आहे.