छोट्या पडद्यावरील अभिनेत्री टिना दत्ता लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टीना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच टीनाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत टीना रेस्टॉरंटमध्ये चोरी करत असल्याचे दिसून आले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
टीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत टीना एका रेस्टॉरंटमध्ये असून ती तिच्या ऑर्डरची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. टीनाची कॉफी आल्यानंतर ती इथे-तिथे पाहते आणि नंतर वाटीत असलेले साखरेचे काही पॅकेट्स तिच्या बॅगमध्ये टाकते. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत टिना म्हणाली, मी असं करत नाही, पण जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच हसायला येईल. टीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘बिचुकले पुरुषी अहंकारी अन्…’, शमिताने शो सोडण्याची व्यक्त केली इच्छा
आणखी वाचा : “तुझ्या वडिलांच्या…”, चाहतीने डॅडी म्हटल्याने आर माधवनचे भन्नाट उत्तर
दरम्यान, टीनाला खरी लोकप्रियता ही उतरन या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने इच्छा ही भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त टीनाने डायनसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर खतरो के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये देखील ती स्पर्धक म्हणून होती.