बांधकाम व्यवसायात अग्रगण्य  नाव असलेल्या ‘तिरुपती बालाजी ग्रुप’ ने  मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करत उत्तम चित्रपट निर्मितीचा मानस व्यक्त केला  आहे. या  बाबतची  घोषणा  नुकतीच  एका  शानदार  कार्यक्रमात करण्यात आली. याप्रसंगी ‘तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स’च्या लोगोचे अनावरण ही करण्यात आले असून ‘तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स’  तर्फे ‘काव काव  कावळे’ या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मितीची घोषणा करण्यात आली. लवकरच हा धमाल चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. महेंद्र पवनकुमार सिंह हे ‘तिरुपती बालाजी ग्रुप’चे संस्थापक तसेच सर्वेसर्वा आहेत.
या  कार्यक्रमाला ‘काव काव कावळे’ या चित्रपटातील कलाकार व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘काव काव कावळे’ चित्रपटाची पहिली झलक ही या कार्यक्रमात दाखवण्यात आली. ‘काव  काव कावळे’ चित्रपटाच वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मराठी चित्रपटातून आशातांईचा सुमधुर स्वर ऐकायला  मिळणार आहे. शिवाय या सिनेमातून वैशाली सामंत संगीतकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. ‘काव काव कावळे’ हा सामाजिक अवमुल्यनावर भाष्य करणारा सिनेमा असून निलेश साबळे, विजय चव्हाण, अरुण नलावडे, विद्याधर जोशी, सक्षम कुलकर्णी, मिलिंद शिंदे, धनश्री कडगांवकर हे लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   
मराठी चित्रपटाप्रमाणे अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची निर्मिती ही ‘तिरुपती बालाजी मोशन्स पिक्चर्स’ यांच्या वतीने आगामी काळात करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा