तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली काही वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेचे देशभरात अनेक चाहते आहेत. जेठालाल, दयाबेन, टप्पू, भिडे, सोधी, बबिता, अय्यर ही सर्व पात्र अनेक भारतीयांना जवळची झाली आहेत. गेल्या काही महिन्यांत करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात मालिकांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. याचा फटका तारक मेहता मालिकेलाही बसला. परंतू सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा या मालिकेचे नवीन भाग चित्रीत व्हायला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे हे पात्र साकारणारा मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकरने आपला जिमींग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेला टप्पू आणि भिडे सर यांच्यात नेहमी द्वंद्व रंगलेलं असतं. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी म्हणून नेहमी रुबाब मिरवणारे भिडे सर हे टप्पू आणि आपली मुलगी सोनू यांनी एकत्र राहू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात.