माहितीची स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या शोमध्ये नुकतीच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील कलाकार हजेरी लावणार आहेत. या भागामध्ये पोपटलालने अमिताभ बच्चन यांना विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या येत्या शुक्रवारच्या भागामध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल (दिलीप जोशी), कोमल हाती (अंबिका रंजनकर), पोपटलाल (श्याम पाठक), मालिकेचे निर्माते असित मोदी आणि इतर काही कलाकार हजेरी लावणार आहेत. जवळपास मालिकेतील २१ कलाकार बिग बींसोबत मजा मस्ती करताना दिसणार आहेत. त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
VIDEO: सेक्स की फूड?; समांथाने दिलेल्या उत्तराने उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कौन बनेगा करोपडपती’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये श्याम पाठक हे हॉट सीटवर बसल्याचे दिसत आहे. तेव्हा ते अमिताभ यांना ‘सर, तुम्ही माझे लग्न लावून देऊ शकता का? मला स्वयंपाक घरातील कामे येतात’ असे म्हटले आहे. ते ऐकून बिग बींना हसू अनावर होते. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तसेच कौन बनेगा करोडपती शोमधील ब्रेक मध्ये जेठालाल खायला घेऊन येतो. त्यानंतर संपूर्ण टीम सेटवर बिग बींसोबत गरबा करताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये येत्या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Story img Loader