विराट, अनुष्का या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले जाते. दोघे एकमेकांच्या करियरमध्ये व्यस्त जरी असले तरी एकमेकांसाठी वेळ काढत असतात. मध्यंतरी दोघांचा मुंबईमध्ये गाडीवर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. दोघांचे चाहते त्यांच्या फोटोस पोस्टना भरभरून प्रतिसाद देत असतात. ११ डिसेंबर २०१७ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी इटलीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा हा दिल्लीत पार पडला होता. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांची प्रेमकहाणी खूपच रंजक होती. कारण दोघांनीही डेट केले, रिलेशनशिप तुटल्याची बातमीही आली आणि मग ते एकत्र दिसले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१३मध्ये पाहिले भेट :

दोघांची पहिली भेट २०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान झाली होती. जिथे दोघांनी ही जाहिरात चित्रित केली होती. त्यावेळी कोहली ही जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि अनुष्काचे चित्रपट हिट होत होते. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात आपले पाय रोवले होते. जाहिरातीच्या चित्रीकरणानंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसले. पण दोघे एकमेकांना मित्र म्हणायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिका टूर संपल्यानंतर विराट कोहली अनुष्काला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचला तेव्हा दोघांमधील नातं चर्चेत आलं. विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का २०१४ मध्ये न्यूझीलंडलाही पोहोचली होती. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये दिसली होती. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती विराट कोहलीच्या फ्लाइंग किसची. नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इंडियन सुपर लीगमध्येही एकत्र बसलेले दिसले होते.

“मी विक्रम वेधा…” केआरकेने पुन्हा बॉलिवूडवर साधला निशाणा

२०१६ मध्ये दोघांच्यात ब्रेकपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. मात्र काही दिवसानंतर त्यांच्यातील दरी कमी झाली. बऱ्याच चढ-उतारानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इटलीतील टस्कनी येथील बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये दोघांनी लग्न केले. आज त्यांना वामिका नावाची एक मुलगीदेखील आहे.

बॉलिवूड क्रिकेट हे नातं तस आधीपासूनच आहे. पतौडी, शर्मिला टागोर यांच्यापासून ते आजतागायत विराट अनुष्कापर्यंत. विराटसध्या टी२० मालिकेसाठी मोहाली येथे गेला आहे तर अनुष्का तब्बल ५ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ मध्ये ती दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To know more about love story of cricketer virat kohli and bollywood actress anushka sharma spg