‘धूम ३’ चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता आमिर खान याचे मानणे आहे की समाजातील बदलत्या मूल्ल्यांचा चित्रपटांवर प्रभाव पडत आहे, ज्यामुळे चित्रपटातील नायक आणि खलनायक यांच्यातील सिमारेषा धूसर होत आहे.
‘धूम’ :२००४ आणि ‘धूम २’ :२००६ च्या यशानंतर अगदी सुरवातीपासूनच या शृंखलेतील तिस-या चित्रपटाविषयीच्या चर्चेचा बाजार गरम होता. ‘धूम’ चित्रपटाच्या अगामी शृंखलेत आमिर खान नकारात्मक भूमिकेत दिसणार असून यात तो पडद्यावर कॅथरीना कैफ बरोबर रोमांन्स करताना दिसेल.
आमिरने पीटीआयला सांगितले, “माझ्या मते खलनायक आपल्या समाजातूनच येतात. हल्ली पटकथेत खलनायकाचे पात्र मुद्दाम निर्माण करण्याची गरज भासत नाही. एके काळी आपल्या समाजात नैतिकतेची स्पष्ट मूल्ये होती. त्यावेळी कथेत अशी माणसे खलनायक असत जी यात योग्यपणे बसत नव्हती. एके काळी गिरणी मालक सुध्दा खलनायक होता.”
तो पुढे म्हणाला, आता पडद्यावरील खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त बदल झाला आहे आणि तो पुर्वीसारखा राहिला नाही. पुर्वी स्मग्लर, गुंड आणि राजकीय नेते खलनायक म्हणून पडद्यावर दाखवले जात आणि प्रेक्षक म्हणू शकत होते की ते त्यांना पसंद करत नाहीत, परंतू आता असे स्पष्ट विभाजन राहिले नाही. हल्ली तेव्हढी कट्टर नैतिक मुल्ये सुध्दा राहिली नाहीत. आता चतूर आणि संधीसाधू असणे चुकीचे मानले जात नाही. आताच्या काळात कोणता एक विचार किंवा नैतिक मूल्य काळे वा सफेद अथवा चुकीचे वा बरोबर राहिलेले नाही.
‘धूम’ शृखलेतील या चित्रपटात सुध्दा साहसी चोरी आणि सुसाट वेगातील मोटारसायकलींची शर्यत अशाप्रकारची अनेक दृश्ये यामध्ये आहेत. यात अभिनेता अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा अनुक्रमे जय आणि अलीच्या भूमिकेत दिसतील.
पुढील वर्षी प्रदर्शित होणा-या ‘धूम ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्टर आचार्य याने केले असून निर्मिती आदित्या चोप्रा यांची आहे.
चित्रपटात दाखवला जाणारा आजचा खलनायक समाजातूनच येतो : आमिर खान
'धूम ३' चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा अभिनेता आमिर खान याचे मानणे आहे की समाजातील बदलत्या मूल्ल्यांचा चित्रपटांवर प्रभाव पडत आहे, ज्यामुळे चित्रपटातील नायक आणि खलनायक यांच्यातील सिमारेषा धूसर होत आहे.

First published on: 29-11-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays villains come from society not from script aamir khan