‘जोकर’ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सुपरस्टार व्हाकिन फिनिक्स याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ‘जोकर २’ साठी व्हाकिन फिनिक्सला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी व्हाकिन फिनिक्सचा या चित्रपटातील लूक रिवील करण्यात आला होता. या लूकमध्ये व्हाकिनबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल माहिती समोर आली होती. व्हाकिन फिनिक्ससह अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागादेखील या चित्रपटात झळकणार असल्याचं या पोस्टवरुन स्पष्ट झालं होतं. या दोघांचा हा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. लेडी गागा या चित्रपटात हारले क्वीन हे पात्र साकारणार आहे.
आणखी वाचा : ‘शोले’च्या स्टारकास्टचं मानधन ठाऊक आहे का? जया बच्चन यांना मिळालेले फक्त ‘इतके’ रुपये
आता पुन्हा २०२४ च्या ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त दिग्दर्शक टॉड फिलीप्स यांनी आगामी चित्रपटातील व्हाकिन फिनिक्स आणि लेडी गागा यांचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये व्हाकिन फिनिक्स व लेडी गागा यांच्यात कमालीची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हारले क्वीन आणि जोकर दोघेही या नव्या पोस्टमध्ये रोमान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
‘जोकर’चा हा पुढचा भांग एक सांगीतिक मेजवानी असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकर या पात्राला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथलाही ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चाहत्यांच्या आग्रहाखातर ‘जोकर’ या स्वातंत्र्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला.