‘टॉडलर्स अँड टियाराज’ (Toddlers Tiaras) या मालिकेत काम करणारी अतिशय लोकप्रिय बाल कलाकार कॅलिया पोसीचे (Kailia Posey) निधन झाले आहे. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी तिचे निधन झालेय कॅलियाच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची बातमी दिली आहे.

कॅलियाच्या आई कॅलियाची आई मार्सी पोसी गॅटरमन यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. कॅलियाचा २ मे रोजी कार अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांनी फेसबुकवर मुलीचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. “माझी सुंदर बेबी गर्ल आम्हाला सोडून गेली. कृपया आम्हाला प्रायव्हसी द्या. कारण कॅलियाच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. ती कायमच माझी लाडकी मुलगी असेल” या आशयाचे कॅप्शन मार्सी यांनी फोटोसोबत दिले आहे.

कॅलिया ‘टॉडलर्स अँड टियाराज’ या मालिकेत आईसोबत दिसली होती. निधनाच्या काही दिवस आधी कॅलियाने एक खतरनाक स्टंट केला होता. जमॅका येथील ओचो रियोस येथे स्टंट करतानाचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती टेकडीवरुन पाण्यात उडी मारताना दिसली होती. हा फोटो शेअर करत कॅलियाने ‘शांति, प्रेम, सन्मान’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

Story img Loader