टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुर्वणपदक मिळाले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान अभिनेत्री तापसी पन्नूने ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे.

तापसीने ट्विटरद्वारे नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपण सुवर्णपदक जिंकलो. मी आनंदाने उड्या मारत आहे. नीरज चोप्रा या तरुणाने इतिहास रचला’ या आशयाचे ट्वीट तापसीने केले आहे. तिच्या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रणवीर सिंगने देखील सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त केला आहे. त्याने नीरजचा फोटो शेअर करत ‘भारत माता की जय’ असे म्हटले आहे.

Neeraj Chopra Gold Medal, Neeraj Chopra

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, स्वरा भास्कर, नेहा धूपिया, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, राहुल बोस, मधुर भंडारकर, विकी भगनानी, हेमा मालिनी, मिनिषा लांबा आणि इतर काही कलाकारांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त केला आहे.

नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून नीरजने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं. नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

Story img Loader