सध्या जगभरातील क्रिडा प्रेमींची लक्ष टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेकडे आहे. खेळाच्या या कुंभमेळ्यात जगभरातील स्पर्धक विविध खेळांमध्ये त्यांचं कौशल दाखवत असतात. विविध देशातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले आहेत. जगभरातील अनेकजण बॉलवूडच्या प्रेमात आहे याची झलक नुकत्याच झालेल ऑलिम्पिक स्पर्धेतील जलतरण सामन्यात पाहायला मिळाली.
मगंळवारी टीम इस्रायलच्या इडन ब्लेचर आणि शेलि बोब्रित्स्की यांच्या जोडीने कलात्मक जलतरण दुहेरी फेरीत माधुरी दीक्षितच्या ‘आजा नच ले’ या गाजलेल्या गाण्यावर जलतरण नृत्य सादर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या या दोघींच्या या खास परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर अनेक भारतीयांनी देखील ऑलिम्पिकला बॉलिवूडचा तडका दिल्याने या इस्रायली जोडीचं कौतुक केलंय.एक नेटकरी व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “टीम इस्राईलचे खूप खूप आभार !!! हे ऐकून आणि पाहून मला किती आनंद झाला याची तुम्ही कल्पना करू शकत नाही…आजा नचले”
हे देखील वाचा: हद्द झाली: फायनलला पोचला रवी कुमार; चाहते आभार मानतायत सलमान, आमीर खानचे
Thank you so much Team Israel for this!!! You have no idea how excited I was to hear and see this!! AAJA NACHLE!!! #ArtisticSwimming #Olympics #Tokyo2020 pic.twitter.com/lZ5mUq1qZP
— (@AnneDanam) August 4, 2021
एडन ब्लेचर आणि शॅली बोब्रिट्स्की या इस्त्रालयलच्या महिला जलतरणपटूंनी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. टोक्यो अॅक्वेटिक्स सेंटरमध्ये झालेल्या या फेरीमध्ये सादरीकरण करताना त्यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. पण अंतिम फेरी गाठण्यात मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही.
इस्रायलच्या इडन ब्लेचर आणि शेलि बोब्रित्स्की या जोडीला पुढच्या फेरीत जाता आलं नसलं तरी त्यांनी भारतीयांची मनं जिंकली आहेत.
ऑलिम्पिकच्या अधिकृत वेबसाईटनुसार,या फेरीत स्पर्धकांना सिंक्रोनाइझेशन, तंत्र आणि नृत्य दिग्दर्शनाच्या आधारे गुण दिले जातात.