आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या दोन्ही चित्रपटांना अपेक्षेपेक्षा जास्त यश त्यांना जास्त मिळाले नाही. मात्र कमी बजेटअसलेला ‘सीता रामम’ हा दाक्षिणात्य चित्रपट उत्तमरित्या चालला. ‘सीता रामम’ हा तेलगू काळातील रोमँटिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. चित्रपटात दुल्कर सलमान, मृणाल ठाकूर, रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला चित्रपटातील काही कलाकार उपस्थित राहिले होते.

या चित्रपटातील मुख्य अभिनेता दुलकर सलमानला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘या चित्रपटाची तुलना शाहरुखच्या वीरजारा या चित्रपटाशी होत आहे. ‘वीरजारा’ चित्रपटात शाहरुख खान होता शाहरुखची ओळख म्हणजे किंग ऑफ रोमान्स, तर अशा शाहरुखशी तुझी तुलना होत आहे याबद्दल काय सांगशील’? त्यावर सलमानने उत्तर दिले ‘मी स्वतः एक शाहरुख सरांचा एक मोठा चाहता आहे मग ते पडद्यासमोर किंवा पडद्यामागे, ते एक आमच्यासाठी प्रेरणा आहेत. ते लोकांशी कसे वागतात? लोकांचा आदर कसा करतात, महिलांबद्दल त्यांना कायमच आदर आहे. ते जरी शंभर लोकांशी बोलत असतील तरी असे वाटते कि ते फक्त तुमच्याशी बोलत आहेत. मी शाहरुख सरांचे चित्रपट बघून मोठा झालो आहे. दिलवाले हा माझा आवडता चित्रपट आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघू शकतो. माझी आणि त्यांची तुलना करणे हा माझा अपमान आहे’.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने मला.. ” अभिनेता सोनू सूदने केला खुलासा

चित्रपटाची कथा आहे ती लेफ्टनंट रामची. जो लष्करी अधिकारी असून काश्मीर सीमेवर तैनात आहे. त्याला सीता महालक्ष्मीचे निनावी प्रेमपत्र मिळाल. यानंतर राम सीतेला शोधण्याच्या मोहिमेवर निघतो. तो सीतेचा शोध घेतो आणि तिला प्रपोज करू इच्छितो. या चित्रपटाद्वारे मृणाल ठाकूरने तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे. सीता रामम मध्ये १९६४ चा काळ दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटात मृणालने सीतेची, दुलकर सलमानने राम आणि आफरीनची भूमिका रश्मिका मंदानाने साकारली आहे. चित्रपटाचे बजेट ३० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.सीता राममने पहिल्या दिवशी जगभरात ५.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. दुलकर सलमानने हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. कारवा या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आर बल्की यांच्या चूप या आगामी चित्रपटात तो दिसणार आहे.