Samantha Ruth Prabhu : रोजचं आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. जीवनातील प्रत्येक दिवस चांगला असतो, असे नाही. काही दिवस चांगले गेल्यावर वाईट दिवस देखील येतात. अडचणी आणि दु:ख प्रत्येकाच्या मार्गात असते. मात्र यामुळे हतबल न होता प्रत्येकाला पुढे जावे लागते. येणाऱ्या अडचणींपासून स्वत:च्या मनाला धीर मिळावा म्हणून अनेक जण चांगली प्रेरणा देणाऱ्या कविता, गाणी आणि गोष्टी ऐकतात. अशात दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक प्रेरणादायी कविता पोस्ट केली आहे. तिच्या या कवितेने अर्जुन कपूरला सुद्धा फायदा झाल्याचं त्याने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा २०२१ मध्ये नागा चैतन्यबरोबर घटस्फोट झाला. या काळात समांथा काहीशी नैराश्यात होती. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेखक रुडयार्ड किपलिंग यांची एक कविता पोस्ट केली आहे. समांथाने या कवितेची दोन पाने पोस्ट केली आहेत. ही एक प्रेरणा देणारी कविता आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “या कवितेने कायम मला योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले आहे आणि मला ही कविता तुमच्याबरोबरही शेअर करावी वाटते.”

हेही वाचा : सूरज चव्हाणने अशोक सराफ यांना दिल्या गुलीगत शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “झापूक झुपूक पॅटर्नमध्ये…”

समांथाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यात बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही कमेंट केली आहे. त्याने लिहिलं आहे, “या कवितेची एक प्रत मी माझ्या घरातील एका भिंतीवर लावलेली आहे. जेव्हा मला प्रेरणेची गरज होती, तेव्हा खरोखर या कवितेची फार मदत झाली.” समांथाच्या या पोस्टवर अन्य काही नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रुडयार्ड यांनी १८९५ मध्ये राजकारणी लिएंडर स्टार जेम्स यांना श्रद्धांजली म्हणून ही कविता लिहिली होती. बॉक्सर मोहम्मद अलीदेखील प्रेरणा मिळावी आणि पुढे जाता यावं यासाठी त्यांच्या पाकिटात कायम या कवितेची एक प्रत ठेवायचे.

समांथा रुथ प्रभूच्या अभिनयातील कामाविषयी बोलायचे झाल्यास, अभिनेत्री नुकतीच बॉलीवूड अभिनेता वरुण धवनबरोबर ‘सिटाडेल: हनी बनी’ या सिरीजमध्ये झळकली. तसेच २०२३ मध्ये आलेला तेलगू चित्रपट ‘कुशी’मध्ये तिचा अभिनय पहायला मिळाला. सध्या समांथा ‘रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम’ या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा : आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, “माझ्याकडून…”

अर्जुन कपूरसध्या त्याच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूरनेदेखील दमदार अभिनय केला आहे.