दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा, बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत होता. १२० कोटी रुपयांचं बजेट असलेला लायगर बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांच्या आसपासच गल्ला जमवू शकला.
‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली. मात्र जोरदार प्रमोशन करूनही चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता हा चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे. २१ सप्टेंबर रोजी डिस्ने हॉटस्टार यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता आपल्याला ‘डिस्ने हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे.
…म्हणून मी अमिताभ बच्चन, राजू श्रीवास्तव यांनी केला होता खुलासा
या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे. पहिल्याच दिवशी जगभरात ‘लायगर’ने ३३ कोटी १२ लाख रुपये कमाई केली होती. मात्र नंतर प्रेक्षकांनी या चित्रपटकडे पाठ फिरवली होती. प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडाने वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याचा फटका चित्रपटाला बसला असावा.
या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे पदार्पण अयशस्वी ठरलं. विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. या चित्रपटातून प्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माईक टायसनचे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पणदेखील होते.