Mission Impossible 8 Teaser Released : भारतातील बेस्ट अ‍ॅक्शन हीरो म्हणून अक्षय कुमारकडे पाहिले जाते. पण, जगातील बेस्ट अ‍ॅक्शन हीरो म्हणून प्रेक्षक एकाच अभिनेत्याकडे पाहतात आणि तो अभिनेता म्हणजे हॉलीवूड सिनेमाचा स्टार टॉम क्रूझ. जगातील सर्वांत हॅण्डसम अभिनेत्यांच्या यादीत या अभिनेत्याचे नाव सर्वांत वर असून, टॉम क्रूझ जगातील सर्वांत बेस्ट अ‍ॅक्शन हीरो मानला जातो. याचे कारण म्हणजे त्याची ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटांची मालिका. अशक्यप्राय वाटणारे मिशन्स, गुप्तहेराची थ्रिलर व रहस्यमय कथा आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स ही या चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा आठवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्याचा टीजर प्रदर्शित झाला आहे.

या सिनेमाचे आजवर सात भाग आले असून, आठवा भाग ‘मिशन इम्पॉसिबल : द फायनल रेकॉनिंग’चा टीजर आला आहे. तसेच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Pranav Mohanlal is working on a farm in Spain for food
वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
donald trump latest marathi news
विश्लेषण: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अनपेक्षित मुसंडी कशी?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा…अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

खोल समुद्र आणि बर्फाच्छादित प्रदेशातील मिशन

टीजरच्या सुरुवातीला आजवर टॉम क्रूझने केलेल्या विविध भागांमधील मिशनची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने ‘मिशन : इम्पॉसिबल – डेड रेकॉनिंग पार्ट वन’ (मिशन इम्पॉसिबल ७) या भागाचे दृश्य असून, त्यावरून या भागामध्ये टॉम क्रूझसाठी कुठले मिशन असणार याचा अंदाज येतो. एजंट इथन हंट (टॉम क्रूझ) या टीजरमध्ये बर्फाच्छादित प्रदेशात, तर कधी खोल समुद्रात एक वस्तू शोधतो, असे दिसते. खोल समुद्रात एका पाणबुडीजवळ जाऊन टॉम क्रूझ चावीसदृश्य वस्तू शोधतो, असे टीजर पाहून समजते. टॉम क्रूझने ती वस्तू शोधली नाही, तर जगावर संकट येईल, असे टीजरमध्ये दाखवण्यात आले आहे. या टीजरमध्ये टॉम क्रूझचे ‘मिशन इम्पॉसिबल‘ला शोभून दिसतील असेच फायटिंग सीन्स, उंच विमानात मारामारीचे सीन्स दिसून येतात. तर नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी कल्पनाही केल्या नसतील अशा गोष्टी यात असतील, असे टीजरच्या गूढ दृश्यांवरून दिसून येते.

वन लास्ट टाइम

मागील २८ वर्षांपासून टॉम क्रूझ (Tom Cruise) ‘मिशन इम्पॉसिबल‘ सिनेमाचे भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग १९९६ साली आला होता. प्रेक्षक दोन पिढ्यांपासून या चित्रपटाचे चाहते आहेत. ‘मिशन इम्पॉसिबल : द फायनल रेकॉनिंग’ (Mission: Impossible – The Final Reckoning) हा या सिनेमाचा शेवटचा भाग असू शकतो, असे सांगितले जाते. या टीजरमधूनसुद्धा तसे संकेत मिळत आहेत. टीजरमध्ये अधूनमधून आजवरच्या विविध भागांची झलक दाखवली गेली असून, हे शेवटचे मिशन आहे, असे संकेत टीजर संपताना मिळतात. कारण- टॉम क्रूझ या सिनेमात शेवटी त्याच्या सहकाऱ्यांना उद्देशून तुम्ही एकदा शेवटचा माझ्यावर विश्वास ठेवा, असे सांगतो. त्यामुळे हा सिनेमा पाहायला चाहते गर्दी करतील, असा अंदाज केला जात आहे.

हेही वाचा…दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

म्हणून ‘मिशन इम्पॉसिबल’ आहे लोकप्रिय

काळाच्या पुढे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर, अशक्य वाटणारे मिशन्स आणि जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स व ते करण्यासाठी टॉम क्रूझची समर्पण वृत्ती यांमुळे या सिनेमाचे भाग लोकप्रिय झाले आहेत. टॉम क्रूझने या सिनेमासाठी आजवर स्वतः स्टंट केले आहेत. कधी विमानातून उडी मारून, तर कधी जगातील सर्वांत उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’वर चढत टॉम क्रूझने आजवर या सिनेमासाठी अ‍ॅक्शन केली आहे. या सिनेमाचा शेवटचा भाग पुढील वर्षी २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.