Mission: Impossible 8: भारतीय प्रेक्षकांमध्ये हॉलीवूडच्या अ‍ॅक्शन चित्रपटाची खूप क्रेझ आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल’ एक लोकप्रिय फ्रेंचाइजी आहे; ज्याचे अनेक भारतीय चाहते आहेत. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ ( Tom Cruise ) स्टारर ‘मिशन; इम्पॉसिबल’चा शेवटचा भाग सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच निर्मात्यांनी ‘मिशन: इम्पॉसिबल ८’मधील टीझर प्रदर्शित केल्यामुळे चाहत्यांमधली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या ‘मिशन: इम्पॉसिबल – फायनल रेकनिंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. अशातच टॉम क्रूझने एका मुलाखतीमध्ये चित्रपटातील एका स्टंट मागचा थरारक किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मिशन: इम्पॉसिबल – फायनल रेकनिंग’ ( Mission: Impossible – The Final Reckoning ) चित्रपट २३ मे २०२५ला प्रदर्शित होणार आहे. पुन्हा एकदा चित्रपटात टॉम क्रूझचे जबरदस्त स्टंट पाहायला मिळणार आहे. टॉमने सोशल मीडियावर चित्रपटाच्या चित्रीकरणातील एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अलीकडचे प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरमधील एक स्टंट व्हिडीओ आहे. यात टॉम क्रूझ विमानाच्या बाहेर उलटा लटकलेला पाहायला मिळत आहे. याविषयी टॉमने खुलासा केला की, हा स्टंट चित्रीकरण करताना ऑक्सीजन कमी असल्यामुळे बेशुद्ध झाला होता.

टॉम क्रूझने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी एका वेगळ्या विमानातून स्टंटचं चित्रीकरण करताना दिसत आहेत. तर टॉम क्रूझ हवेत असलेल्या विमानाला पकडून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. ‘एम्पायरला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये टॉम क्रूझने या स्टंटमागचा किस्सा सांगितला.

टॉम क्रूझने सांगितलं की, जेव्हा तुम्ही १०२ ते १३० मिली प्रति तास वेगात असलेल्या विमानातून तोंड बाहेर काढता, तेव्हा ऑक्सीजन मिळत नाही. त्यामुळे मला श्वास घेण्याची पद्धत शिकावी लागली. अनेकदा मी बेशुद्ध झालो होतो. मी कॉकपिटपर्यंत पोहोचू शकत नव्हतो.

दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी सांगितलं की, ‘मिशन: इम्पॉसिबल – फायनल रेकनिंग’ या फ्रेंचाइजचे आधी चित्रपटांमधील दाखवलेले स्टंट मर्यादा पलीकडेचे आहेत. पण, आता येणाऱ्या चित्रपटातील स्टंट पाहून तुम्ही हैराण व्हालं. चित्रपटात आफ्रिकेचा एक दिवस असेल. ज्यामध्ये टॉम असं काही करेल जे त्याने आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. या चित्रपटातील स्टंटच्या सीन्समुळे तो इतका टेन्शनमध्ये होता की चित्रीकरणादरम्यान त्याला उलट्या झाल्या.

दरम्यान, ‘मिशन: इम्पॉसिबल’ फ्रेंचाइची सातवा चित्रपट ‘मिशन: इम्पॉसिबल – डेड रेकनिंग’ होता, जो २०२३मध्ये प्रदर्शित झाला होता. आता २०२५मध्ये त्याचा पुढचा भाग ‘फायनल रेकनिंग’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टॉम क्रूझ व्यतिरिक्त हेली एटवेल, विंग रेम्स, सायमन पेग, व्हेनेसा किर्बी, एसाई मोरालेस, पॉम क्लेमेंटिफ, हेन्री चेरनी, अँजेला बससेट आणि रॉल्फ सॅक्सन महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.