‘स्पायडर-मॅन’ स्टार टॉम हॉलंड आपली कारकीर्द एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध चित्रपट निर्माता क्रिस्तोफर नोलनच्या आगामी, नाव न जाहीर केलेल्या चित्रपटासाठी टॉम हॉलंडची निवड झाली आहे. या चित्रपटात हॉलंडबरोबर मॅट डेमनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मॅट डेमन यापूर्वी नोलनच्या ‘ओप्पेनहायमर’ आणि ‘इंटरस्टेलर’ या चित्रपटांमध्ये झळकला होता. हा चित्रपट स्वतः नोलनने लिहिला असून, २०२६ मध्ये तो प्रदर्शित होणार आहे.
‘द हॉलीवूड रिपोर्टर’च्या माहितीनुसार, युनिव्हर्सल पिक्चर्स या ‘टॉप सिक्रेट’ प्रोजेक्टचे वितरण करणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी स्टुडिओने १७ जुलै, २०२६ ही तारीख निश्चित केली आहे. नोलन आणि त्याची पत्नी एम्मा थॉमस या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मागील काही आठवड्यांपासून नोलनच्या आगामी चित्रपटाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. नोलनचा पुढील चित्रपट कोणत्या प्रकारचा असेल, याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. नोलनने याआधी ‘द डार्क नाईट’ ट्रिलॉजी, ‘इंटरस्टेलर’, ‘इंसेप्शन’, ‘द प्रेस्टीज’, ‘डनकर्क’, ‘मेमेंटो’ आणि ‘टेनेट’ यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
‘गिझमोदो’च्या माहितीनुसार, नोलनचा पुढील चित्रपट १९२० च्या दशकात घडणारा ‘वॅम्पायर’ चित्रपट असेल. नोलन पहिल्यांदाच या शैलीतील चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट ‘हॉरर’ शैलीचा असेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, बीएफआयमध्ये नोलनने सांगितले होते की, जर त्याच्याकडे एखादी “अपवादात्मक कल्पना” आली, तर ते नक्कीच हॉरर चित्रपट करण्यास उत्सुक असेल.
ख्रिस्तोफर नोलनने २०२३ साली ‘ओप्पेनहायमर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यात सिलियन मर्फीने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट जगभरात ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाला १३ अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली, ज्यात नोलनने पहिल्यांदाच ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा पुरस्कार पटकावला. दरम्यान, टॉम हॉलंड पुढील वर्षी ‘स्पायडर-मॅन ४’ आणि ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ या चित्रपटांसाठी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये पुनरागमन करणार आहे. या दोन चित्रपटांच्या शूटिंगसह हॉलंड नोलनच्या चित्रपटाचेही शूटिंग करणार आहे.