माधुरीच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची रिलीज डेट ठरली आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा वाढता प्रेक्षकवर्ग आणि एकंदर चित्रपटाच्या कथांनकांमध्ये असणारं नाविन्य या सर्व गोष्टी लक्षात घेत बॉलिवूडकरही आता त्यांचा मोर्चा या चित्रपटांकडे वळवू लागले आहेत. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेनेसुद्धा या स्पर्धेत उडी घेतली असून, आता आणखी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. माधुरी दीक्षितच्या आगामी ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटासोबत करणच्या धर्मा प्रॉडक्शन्सचं नावही जोडलं गेलं आहे.

खुद्द माधुरी आणि करणनेच ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरुन बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही अखेर सर्वांसमोर आली आहे. २५ मे ला ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीचा माहोल असतानाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या ‘बकेट लिस्ट’ची बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत करिअरसाठी आली होती दिशा पटानी

सातासमुद्रापार झाला टेलिव्हिजन अभिनेत्रीचा अनोखा साखरपुडा

PHOTOS : प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकला हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता

‘होय, मला हिंदी येत नाही’, अभिनेत्रीची प्रांजळ कबुली

टॉयलेट एक ‘प्रेरणा’ कथा, अक्षय कुमारने जुहू चौपाटीवर बांधलं शौचालय

कपिलचा नवाकोरा शो होणार लवकरच बंद?

कुठं कुठं जायाचं शूटिंगला; ‘पानिपत’साठी आशुतोष गोवारीकरांची शोधमोहीम सुरु

इरफानसाठी बॉलिवूडचे तिन्ही खान येणार एकत्र

IPLदरम्यान क्रिकेटला सुनील ग्रोवर देणार कॉमेडीचा तडका

मुलासमोर धुम्रपान करणाऱ्या अजयला नेटकरी धारेवर धरतात तेव्हा..

Story img Loader