यंदाच्या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षीत चित्रपट म्हणून ‘पद्मावती’कडे पाहिले जाते आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कारणांनी उत्सुकता ताणून धरणारा ठरला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या व्यक्तिरेखेची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहेच. शिवाय भन्साळींच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातीलही भव्य सेट कसा असेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. या चित्रपटाचे ‘घुमर’ हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. हे संपूर्ण गाणे दीपिकावर चित्रीत करण्यात आले आहे. दीपिकाने आतापर्यंत केलेल्या सर्वात कठीण डान्सपैकी हा डान्स असल्याचे म्हटले जात आहे. तिने या गाण्यासाठी घुमर एक्सपर्ट ज्योती डी. तोमर यांच्याकडून हे नृत्य शिकून घेतले. ज्योती स्वतः घुमरचे क्लासेस घेतात.

Story img Loader