दाक्षिणात्य चित्रपटात आपल्याला वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. वेगळ्या धाटणीचे विषय कधी थरारपट तर कधी हळुवार अशी प्रेमकथा यामुळेच केवळ दक्षिणेतले प्रेक्षकच नव्हे तर संपूर्ण देशातील लोक या चित्रपटांची चाहती आहेत. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर ओटीटीसारख्या माध्यमावर देखील यश मिळवलं आहे. नुकतीच ‘इंडियन २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. कमल हासन यांचा काही वर्षांपूर्वी आलेला ‘इंडियन’ या चित्रपटाचा पुढील भाग असणार आहे. इंडियनमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका साकारली केली होती.
अडचणीत वाढ झाल्यानंतर जॅकलिन पोहोचली देवदर्शनाला, आश्रमातील गुरुजींनी सुचवला ‘हा’ उपाय
कमल हासन हे कायमच प्रयोगशील अभिनेते आहेत. ‘दशावतार’ चित्रपटात त्यांनी तब्बल दहा भूमिका केल्या होत्या. आता दक्षिणेतील आणखीन एक अभिनेता तब्बल २५ भूमिका करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विक्रम यात २५ भूमिकांमध्ये दिसणार आहे. ‘कोब्रा’ चित्रपट उत्कंठावर्धक आणि अॅक्शनने भरलेला असणार हे ट्रेलरवरूनच कळून येत आहे. कोब्रा ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जवळ आल्याने निर्मात्यांनी अखेर ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
अजय ज्ञानमुथु यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर पहिल्यांदाच क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटात काम करत आहे. विक्रमचे चाहते खूप उत्सूक आहेत. कारण तो खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तेलगू, तमिळ आणि हिंदी या तिन्ही भाषेत तो प्रदर्शित होणार आहे. विक्रमचा मणिरत्नमसोबतचा पुढचा चित्रपट पोन्नियिन सेल्वन१ ३०सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.