अभिनेता सनी देओल याला मोठ्या पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. त्याचा प्रत्येक चित्रपट वेगवेगळ्या विषयावर आधारित असून त्यातील त्याची प्रत्येक भूमिका ही वेगळ्या धाटणीची असते. आता पुन्हा एकदा सनी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

आणखी वाचा : अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे ‘ते’ गाणे अखेर आज १७ वर्षांनी झाले प्रदर्शित

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

नावाजलेले दिग्दर्शक आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच चर्चेत आला आहे. ट्रेलरमध्ये दुलकर सलमान प्रियकराच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री श्रेया धन्वंतरी त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसत आहे. चुकीच्या चित्रपट समीक्षणामुळे अनेकांचे खून होताना या ट्रेलरमध्ये दिसत आहेत आणि अभिनेता सनी देओल या खुनांचा तपास या चित्रपटात करताना दिसणार आहे. या चित्रपटाची कथा सस्पेन्सने भरलेली आहे. सनी देओलने त्याच्या ट्विटर हँडलवर ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि लिहिले, “पहा आणि प्रतिक्रिया द्या.”

‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’चा हा ट्रेलर अनेक ट्विस्ट्स, गुन्हेगारी आणि सस्पेन्सने आहे. १ मिनिट ५८ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सनी देओलचा पूर्णपणे वेगळा आणि दमदार अवतार पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुलकर सलमान, पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरी देखील या चित्रपटात वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.

हेही वाचा : पतीपासून २७ वर्षं वेगळं राहूनही डिंपल यांनी घेतला नाही घटस्फोट, सनी देओल होता यामागचं कारण?

हा चित्रपट सीरियल किलर बनलेल्या एका कलाकाराची कथा आहे. हा किलर केवळ चित्रपट समीक्षकांना लक्ष्य करतो. तसेच हा सिरीयल किलर खून केल्यानंतर मृतदेहाच्या अंगावर ‘स्टार’ची खूण तो करतो. ट्रेलरमध्ये दुलकर सलमान आणि श्रेया धन्वंतरी यांची ताजी केमिस्ट्री या चित्रपटाचे आकर्षण ठरत आहे. ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट 23 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader